परभणी, 12 ऑगस्ट (हिं.स.)। गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी येथील 33/11 के.व्ही. वीज उपकेंद्रामध्ये नव्याने क्षमतावाढ केलेल्या व नव्याने आस्थापित केलेल्या अतिरिक्त ऊर्जा रोहित्राचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते पार पडला. या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना अधिक चांगल्या प्रकारे वीज सेवा उपलब्ध होणार आहे.
यावेळी गंगाखेड उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, महावितरणचे अधिक्षक अभियंता आर.के.टेंभुर्णे, यांच्यासह अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते. पिंपळदरी उपकेंद्राची सध्याची क्षमता 3.15 एमव्हीए होती. आता वाढीव क्षमतेमुळे 5 एमव्हीए झाली आहे. वाढीव पावर ट्रान्सफॉर्मर चालू झाल्यामुळे लोड डिव्हाईड होऊन व्हॉल्टेज सुधारेल व विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण कमी होईल. या उपकेंद्रावर जोडलेल्या गावांना व विद्युत ग्राहकांना चांगल्या गुणवत्तेचा वीज पुरवठा मिळेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis