पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करा - मायकल रुबिन
आसिम मुनीर आणि ओसामा-बिन-लादेन एकसारखेचवॉशिंग्टन,12 ऑगस्ट (हिं.स.) : पाकिस्तानी सैन्य प्रमुख आसिम मुनीर यांच्या अणुबॉम्ब हल्ल्याच्या धमकीवजा वक्तव्यावर आता अमेरिकेतूनच तीव्र पतिक्रिया उमटली आहे. पाकिस्तानची भाषा अस्वीकार्य असून पाकिस्तानला दहशतवादी
मायकल रुबिन


आसिम मुनीर आणि ओसामा-बिन-लादेन एकसारखेचवॉशिंग्टन,12 ऑगस्ट (हिं.स.) : पाकिस्तानी सैन्य प्रमुख आसिम मुनीर यांच्या अणुबॉम्ब हल्ल्याच्या धमकीवजा वक्तव्यावर आता अमेरिकेतूनच तीव्र पतिक्रिया उमटली आहे. पाकिस्तानची भाषा अस्वीकार्य असून पाकिस्तानला दहशतवादी देष घोषित करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पेंटगॉनचे माजी अधिकारी मायकल रुबिन यांनी केलेय.

मुनिरच्या बेताल विधानांवर रुबिन म्हणाले की, अमेरिकेच्या भूमीवर पाकिस्तानकडून दिल्या जाणाऱ्या धमक्या पूर्णपणे अस्वीकार्य आहेत. यामुळे अनेक लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, पाकिस्तान आता एक 'जबाबदार देश' म्हणून राहण्याच्या लायकीचा आहे का, की त्याचा अंत होण्याची वेळ आली आहे ? आसिम मुनीर यांची भाषा आम्हाला ओसामा बिन लादेनच्या भाषणांची आठवण करून देते. पाकिस्तानला दिलेला 'प्रमुख गैर-नाटो सहयोगी' देशाचा दर्जा तात्काळ काढून घ्यावा आणि त्याला 'दहशतवादाला पुरस्कृत करणाऱ्या देशांच्या यादीत टाकावे. असेही मायकल रुबिन म्हणाले. रुबिन यांच्या मते, पाकिस्तान हा पहिला गैर-नाटो सहयोगी देश ठरेल, ज्याला 'दहशतवादाला पुरस्कृत करणारा देश' म्हणून सूचीबद्ध केले जाईल. तसेच, पाकिस्तानने आता अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे सदस्य राहू नये. जेव्हा आसिम मुनीर यांनी अमेरिकेच्या भूमीवरच अशी धमकी दिली, तेव्हा अमेरिकन जनरल्सनी त्यांच्यासोबतच्या बैठकीतून वॉकआऊट का केले नाही, याबद्दल रुबिन यांनी आश्चर्य व्यक्त केले. हा एक गंभीर मुद्दा असल्याचे सांगत, ज्या जनरल्सनी असे केले नाही, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा अशी मागणी रुबिन यांनी केली.जोपर्यंत पाकिस्तान यावर स्पष्टीकरण देत नाही आणि माफी मागत नाही, तोपर्यंत आसिम मुनीर आणि इतर कोणत्याही पाकिस्तानी अधिकाऱ्याला अमेरिकेत 'पर्सोना नॉन ग्रेटा' म्हणून घोषित करावे आणि त्यांना अमेरिकेचा व्हिसा देऊ नये, अशी मागणी देखील मायकल रुबिन यांनी केली आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande