जालना, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। सामाजिक न्याय विभागाच्या परिसरात गेल्या 9 वर्षापुर्वी लावण्यात आलेल्या झाडांचा वाढदिवस जिल्हाधिकारी श्रीमती अशिमा मित्तल यांच्या हस्ते नवीन वृक्ष लागवड करुन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांना पेढेही वाटप करण्यात आले. मंगळवार दि. 12 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता हा वाढदिवसाचा सोहळा पार पडला.
यावेळी सहाय्यक आयुक्त राजु एडके, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सचिव अच्युत मोरे, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गणेश अंभुरे, समाज कल्याण निरीक्षक अनिल सुनगत, सर्पमित्र मयुर साबळे, गोकुळ लाड, दिनेश प्रधान, गोपीनाथ ढोले, कृष्णा छत्रे, आशिष खरात, रंगनाथ खरात, अजय शिंदे, सिद्धार्थ जाधव, सुरेंद्र चित्तेकर, वरिष्ठ लिपिक संदीप कांबळे, गजानन गवळी, श्रीमती शारदा जावळे, राहुल तरटे, अमोल चाबुकस्वार, निलेश लक्कस, युवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे जयपाल राठोड, श्रीमती क्षीरसाग, भीम गायकवाड, कु. तृप्ती खैरे, सतीश पळसकर, वायाळ यांच्यासह कर्मचारी, बिव्हीजी व क्रिस्टल कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.
तत्कालीन सहाय्यक आयुक्त बलभीम शिंदे यांनी 9 वर्षापुर्वी मोकळ्या जागेत वृक्ष लागवड केली होती. या वृक्ष लागवडीचा पहिला वाढदिवस तत्कालिन जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्या हस्ते केक कापूर साजरा करण्यात आला होता. त्यानंतर ही परंपरा कायम ठेवण्यात आली. सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त कार्यालय आणि उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने दर वर्षी हा वाढदिवस साजरा करण्यात येतो. नवीन अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचा समन्वय साधून या झाडांचा वाढदिवस अविरतपणे सुरु आहे.
सदरील झाडांचा वाढदिवस हा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते कधी केक कापून साजरा करण्यात येत होता, परंतु, या वर्षी जिल्हाधिकारी श्रीमती अशिमा मित्तल यांच्या हस्ते वृक्ष लागवड करुन साजरा करण्याची परंपरा सुरु करण्यात आली. विशेष म्हणजे जे जिल्हाधिकारी वृक्ष लागवड करतील त्या झाडाला त्यांच्या नावाची पाटी लावण्याची सुचना जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी केली. दरम्यान परिसरात चांगले गार्डन आणि नागरीकांना बसण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.
सदरील परिसरात केलेली वृक्ष लागवडीचे आज मोठ-मोठ्या झाडात रुपांतर झाले आहे. हे झाडं जवविण्यासाठी बलभीम शिंदे यांच्यासह तत्कालिक सहाय्यक आयुक्त अमित घवले आणि कार्यालयातील कर्मचारी यांनी झाडांसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली. त्यामुळे आजीही झाडे उन्हाळ्यात सावली देतात. हा परिसर अत्यंत निसर्गरम्य असून त्यात नवीन झाडांची लागवड करुन भर घालण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / KULKARNI AMIT ANIL