छत्तीसगड : आयईडी स्फोटात एक जवान हुतात्मा
रायपूर, 18 ऑगस्ट (हिं.स.) : छत्तीसगडच्या बीजापूर येथे सोमवारी सकाळी झालेल्या भूसुरूंग (आयईडी) स्फोटात राज्य गस्ती दलाचा (डीआरजी) जवान हुतात्मा झाला. तर 3 जवान जखमी झाले आहेत. याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट आज सकाळी इंद्र
संग्रहित फोटो


रायपूर, 18 ऑगस्ट (हिं.स.) : छत्तीसगडच्या बीजापूर येथे सोमवारी सकाळी झालेल्या भूसुरूंग (आयईडी) स्फोटात राज्य गस्ती दलाचा (डीआरजी) जवान हुतात्मा झाला. तर 3 जवान जखमी झाले आहेत.

याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट आज सकाळी इंद्रावती नॅशनल पार्कजवळ झाला. डीआरजी आणि राज्य पोलिसांची एक संयुक्त पथक रविवारी नक्षलवाद्यांविरोधात ऑपरेशन राबवत होते. याच दरम्यान नक्षलवाद्यांनी रस्त्यावर आयईडी पेरून ठेवले होते. जेव्हा सुरक्षा दलांची टीम त्या ठिकाणी पोहोचली, तेव्हा जोरदार स्फोट झाला. या स्फोटात एक जवान हुतात्मा झाला. बस्तरचे आयजी पी. सुंदरराज यांनी सांगितले की, बीजापूर डीआरजी पथकातील जवान दिनेश नाग यांनी या स्फोटात वीरमरण पत्करले आहे. तर 3 जवान जखमी झाले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. प्राथमिक उपचारानंतर त्यांना अधिक चांगल्या उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवले जात असल्याची माहिती पी. सुंदरराजन यांनी दिली.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande