भारत-चीन : वैचारिक देवाणघेवाणीची प्रतीक्षा - एस. जयशंकर
नवी दिल्ली, 18 ऑगस्ट (हिं.स.) : सर्व प्रकारचा दहशतवाद आणि त्याच्या विविध स्वरुपांविरुद्ध लढा देणे ही महत्त्वाची प्राथमिकता आहे. मला आपापसातील विचारांची देवाणघेवाण होण्याची अपेक्षा आहे. चर्चेतूनभारत आणि चीन यांच्यात एक स्थिर, सहकार्यात्मक आणि दूरदृष्ट
एस.जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी


चीनी परराष्ट्र मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करताना एस. जयशंकर


नवी दिल्ली, 18 ऑगस्ट (हिं.स.) : सर्व प्रकारचा दहशतवाद आणि त्याच्या विविध स्वरुपांविरुद्ध लढा देणे ही महत्त्वाची प्राथमिकता आहे. मला आपापसातील विचारांची देवाणघेवाण होण्याची अपेक्षा आहे. चर्चेतूनभारत आणि चीन यांच्यात एक स्थिर, सहकार्यात्मक आणि दूरदृष्टी असलेले नाते निर्माण करण्यात मदत करेल. यामुळे दोन्ही देशांच्या हितांचे रक्षण करेल आणि चिंता दूर होईल असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी केले. भारत आणि चीन यांच्यात आज, सोमवारी झालेल्या प्रतिनिधी स्तरावरील चर्चेत ते बोलत होते.

चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. वांग यी यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. सोमवारी भारत आणि चीन यांच्यात प्रतिनिधी स्तरावर चर्चा झाली. यावेळी दोन्ही देशांमध्ये वैचारिक देवाणघेवाणीची प्रतीक्षा असल्याचे सांगत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले की, आपण उद्या आमचे विशेष प्रतिनिधी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल यांच्यासोबत सीमावादासंबंधी चर्चा करणार आहात. हे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण आपापसातील संबंध सुधारण्याचा पाया म्हणजे सीमावर्ती भागांमध्ये शांतता आणि सलोखा राखण्याची क्षमता. तसेच, तणाव कमी करण्याची प्रक्रिया पुढे सरसावणे आवश्यक आहे.

याप्रसंगी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी चर्चेदरम्यान सांगितले की, सीमेवरील तणाव सतत कमी होणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. दोन्ही देशांनी अनेक आव्हानांचा सामना केला आहे. आपले संबंध अधिक चांगले होऊ शकतात, परंतु त्यासाठी भारत आणि चीन यांनी एकत्रितपणे पुढे जाणे गरजेचे आहे. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी हे 19 ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार आहेत. तर सुमारे आठवड्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या वार्षिक शिखर परिषदेसाठी चीन दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासह एनएसए अजित डोभाल यांची देखील भेट होणार आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande