छत्रपती संभाजीनगर, 3 ऑगस्ट (हिं.स.)महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत कन्नड तालुक्यातील पिशोर, करंजखेड, चिंचोली आणि चिकलठाण जिल्हा परिषद गटातील शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी साखरवेल येथे बैठक संपन्न झाली.
आगामी दोन ते तीन महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात. रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपैकी पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची शक्यता असल्याने या निवडणुकीसाठी सज्ज व्हा, असे आवाहन केले.
याप्रसंगी माजी आमदार उदयसिंग राजपूत, किसानसेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब मोहिते, तालुकाप्रमुख संजय मोटे, बापू पिंपळे, नारायण जाधव,युवासेना जिल्हा युवाधिकारी उमेश मोकासे, तालुकाधिकारी योगेश पवार व महिला आघाडी तालुका संघटक रूपालीताई मोहिते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis