बालरंगभूमी परिषद वतीने बालनाट्य दिवस उत्साहात
लातूर , 3 ऑगस्ट (हिं.स.) : बालरंगभूमी परिषद लातूर शाखेच्या वतीने २ ऑगस्ट हा बालनाट्य दिवस साजरा करण्यात आला. या दिवसाचं औचित्य साधून बालरंगभूमी परिषदेच्या वतीने संबंध महाराष्ट्रात विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याच अनुषंगाने लातूर शाखेच्यावतीने एक
Yy


लातूर , 3 ऑगस्ट (हिं.स.) : बालरंगभूमी परिषद लातूर शाखेच्या वतीने २ ऑगस्ट हा बालनाट्य दिवस साजरा करण्यात आला. या दिवसाचं औचित्य साधून बालरंगभूमी परिषदेच्या वतीने संबंध महाराष्ट्रात विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याच अनुषंगाने लातूर शाखेच्यावतीने एकपात्री अभिनय स्पर्धा व वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले होते.

या स्पर्धेचे उद्घाटन नाट्यपरिषद महानगर शाखेचे उपाध्यक्ष, रंगकर्मी डॉ. मुकुंद भिसे, व बाल नाट्य दिग्दर्शिका सुनीता देशमुख यांच्या हस्ते झाले. तर स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती शाखा राज्य उपाध्यक्ष तथा नाट्य दिग्दर्शक ॲड. शैलेश गोजमगुंडे, चित्रकार प्रा. विनय बागडे, प्रा. डॉ. दिपक वेदपाठक उपस्थित होते. या स्पर्धेत ४५ बालकलाकार सहभागी झाले होते. त्याचे यथायोग्य परीक्षण जेष्ठ रंगकर्मी श्री प्रदीप भोकरे व श्री दयानंद सरपाळे यांनी केले.सदरील अभिनय स्पर्धेत सर्वोत्कृष्ठ- आयांश जाधव, उत्कृष्ट- गौरवी बोळेगावे, उत्तम- अक्षरा आंधळे, तर दोन प्रशंसणीय- विवर्ष लामतुरे व शांभवी बेलूरे यांना पारितोषिक मिळाले.या स्पर्धेसाठी लातूर जिल्हा अध्यक्षा सुमती बिडवे सोमवंशी, नवलाजी जाधव, रणजित आचार्य, मयूर राजापूरे, रवि अघाव, वनिता गोजमगुंडे, प्रिती ठाकूर, तेजश्री घवले, सुवर्णा बुरांडे, शरीफ पठाण, विशाल वाटवडे, कृष्णा शिंदे, तन्मय रोडगे, अभिषेक शिंदे, अभिजित भड, महादेवी हिंगणे, रविकिरण सावंत, सलीम पठाण, महेश पवार यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिरा वेदपाठक व महेश बिडवे यांनी केले तर आभार शरीफ पठाण यांनी मानले. यावेळी बाल स्पर्धक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande