भारताशी लढणे ट्रम्प यांची मोठी चूक - कॅनेडियन उद्योगपती कर्क लुबिमोव्ह
वॉशिंग्टन, 3 ऑगस्ट (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात भारतावर २५% जास्त करासह रशियासोबत व्यवसाय केल्याबद्दल अतिरिक्त दंडाची घोषणा केली. ज्यामुळे संपूर्ण जगात खळबळ माजली आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयावर ज्येष्ठ कॅने
मोदी- ट्रम्प


वॉशिंग्टन, 3 ऑगस्ट (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात भारतावर २५% जास्त करासह रशियासोबत व्यवसाय केल्याबद्दल अतिरिक्त दंडाची घोषणा केली. ज्यामुळे संपूर्ण जगात खळबळ माजली आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयावर ज्येष्ठ कॅनेडियन उद्योगपती आणि टेस्टबेडचे अध्यक्ष कर्क लुबिमोव्ह यांनी जोरदार टीका केली असून ‘भारताशी लढणे ट्रम्प यांची मोठी चूक आहे.’ असे म्हटले आहे.

टेस्टबेडचे अध्यक्ष कर्क लुबिमोव्ह यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे “ भारतावर जास्त कर लावणे हि एक मोठी भू-राजकीय चूक” असल्याचे म्हटले आहे. ज्याचा आशियातील अमेरिकेच्या धोरणात्मक लक्ष्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यांनी पुढे लिहलं कि, ‘मी हे आधीही सांगितले आहे आणि मी ते पुन्हा सांगेन, डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ व्हिजनमधील सर्वात मोठी समस्या म्हणजे ते भू-राजकीय रणनीती अजिबात विचारात घेत नाही. ‘जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असलेल्या भारताविरुद्ध ट्रम्प आता युद्ध पुकारत आहेत, ज्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कदाचित जगातील सर्वात आदरणीय आहेत आणि अनेक प्रमुख देशांमध्ये त्यांचा प्रभाव आहे.’ असे म्हटले आहे.

पुढे त्यांनी ट्रम्प यांना इशारा दिला आहे की, जागतिक पुरवठा साखळीतील भारताची भूमिका चीनचे वर्चस्व कमी करण्याच्या संदर्भात पाहिली पाहिजे.” त्यांनी पुढे आपल्या पोस्टमध्ये, त्याचा उद्देश चीन आणि ब्रिक्सचे वर्चस्व आणि वाढ कमकुवत करणे आहे, ज्याचा भारत देखील एक भाग आहे आणि चीनमधून उत्पादन हलवणे हा एक नैसर्गिक देश असू शकतो, कारण अमेरिका ५० सेंट टूथब्रश बनवणार नाही” असे म्हटले आहे.

दरम्यान, ट्रम्प यांनी केवळ भारताला ‘डेड इकॉनॉमी’ म्हटले नाही, तर भारताच्या उच्च टॅरिफ धोरणांवरही जोरदार टीका केली. त्यांनी आरोप केला की भारत अमेरिकी वस्तूंवर जगातील सर्वात जास्त टॅरिफ लावतो.त्यामुळे भारत-अमेरिका व्यापार मर्यादित आहे, आणि रशियासोबत भारताचा वाढता व्यापार अमेरिकेच्या प्रतिबंध धोरणाला कमजोर करत आहे.हा ट्रम्प यांचा दृष्टिकोन अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. यापूर्वी रशियाचा वाटा भारताच्या तेल आयातीत १% पेक्षा कमी होता, पण आता तो ३५% पेक्षा जास्त झाला आहे. ट्रम्प यांनी लादलेल्या दंडानंतर, अमेरिकेच्या निर्बंधांना न जुमानता रशियासोबत व्यापार सुरू ठेवण्यासाठी थेट लक्ष्य होणारा भारत पहिला देश बनला आहे.

भारत सरकारने ट्रम्पच्या डेड इकॉनॉमी वक्तव्याला तत्काळ राजनयिक आणि तथ्याधारित उत्तर दिले. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी संसदेत सांगितले की “भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे आणि लवकरच ती तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची अपेक्षा आहे.” ते म्हणाले की, “भारत जागतिक विकासात सुमारे १६ टक्के योगदान देत आहे, कारण विविध सुधारणा आणि भारतीय उद्योगाच्या लवचिकतेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला सर्वात कमकुवत ५ देशांपैकी एकावरून जागतिक विकासाच्या वाढीच्या इंजिनमध्ये रूपांतरित केले आहे

----------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande