ऋतुराजच्या पुनरागमनामुळे सीएसकेची फलंदाजी बळकट होईल – धोनी
चेन्नई, 3 ऑगस्ट (हिं.स.) २०२६ च्या आयपीएलमध्ये ऋतुराज गायकवाडच्या पुनरागमनामुळे चेन्नई सुपर किंग्जची फलंदाजी बळकट होईल असे महेंद्रसिंग धोनीने म्हटले आहे.२०२५ च्या आयपीएलमध्ये पाच सामने खेळल्यानंतर कोपराच्या दुखापतीमुळे ऋतु
महेंद्रसिंग धोनी आणि ऋतुराज गायकवाड


चेन्नई, 3 ऑगस्ट (हिं.स.)

२०२६

च्या आयपीएलमध्ये ऋतुराज गायकवाडच्या पुनरागमनामुळे चेन्नई सुपर किंग्जची फलंदाजी

बळकट होईल असे महेंद्रसिंग धोनीने म्हटले आहे.२०२५ च्या आयपीएलमध्ये पाच सामने

खेळल्यानंतर कोपराच्या दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड स्पर्धेतून बाहेर पडला होता.

धोनीने पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली होती. पण तो संघाचे नशीब बदलू शकला

नाही. आणि सीएसकेचा संघ या हंगामात गुणतालिकेत तळाशी राहिला होता. सीएसकेने १४

सामन्यांमध्ये फक्त चार सामने जिंकले होते.त्यांच्या खराब कामगरीचे प्रमुख कारण म्हणजे

त्यांच्या फलंदाजीत सातत्य नसणे हे होते.

चेन्नईतील

एका कार्यक्रमादरम्यान धोनी म्हणाला, आम्हाला आमच्या फलंदाजीच्या क्रमाबद्दल थोडे काळजी वाटते. पण मला

वाटते की. आता आमचा फलंदाजीचा क्रम स्थिरावला आहे. ऋतुराज गायकवाडपरत येईल. तो

जखमी झाला होता पण तो परत येईलय आणि त्यामुळे आता आमची फलंदाजी बरीच स्थिरावणार आहे.

धोनीने

सांगितले की मिनी लिलावात संघाला आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातील. धोनी

म्हणाला, मी

असे म्हणणार नाही की, आम्ही आयपीएल २०२५ मध्ये ढिलाई केली होती. पण काही कमतरता

नक्कीच होत्या ज्या आम्हाला दूर करायला हव्या होत्या. डिसेंबरमध्ये एक मिनी लिलाव

होणार आहे आणि त्या काळात आम्ही त्या कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न करू.

---------------

हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra


 rajesh pande