अकोला, 30 ऑगस्ट (हिं.स.)।
पोलीस स्टेशन हिवरखेड येथे फिर्यादी पोहेकों प्रमोद चव्हाण
पोलीस स्टेशन हिवरखेड जि. अकोला यांना गुप्त बातमी दारामार्फत खबर मिळाली की,
धोंडा आखर गावाकडुन कडुन अडगाव बु कडे आरोपी हे काही गोवंश जातीचे जनावरे कत्तलीकरीता बोलेरो चारचाकी वाहानामध्ये घेवुन जात आहे
अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरुन फिर्यादी व पोस्टाफ यांनी नाकाबंदी केली असता यातील आरोपी नामे नदीम खान उर्फ राजा दस्तगीर खान वय ४० वर्ष रा. अडगाव बु हा चारचाकी बोलेरो पिकअप मालवाडु वाहन क्रमांक एम. एच.२७.बि.डी. २२७८ मध्ये एकुण ०६ गोवंश जातीचे जनावरे कोंबुन कत्तलीकरीता घेवुन जातांना मिळुन आल्याने एकुण ०६ गोवंश जातीचे जनावरे किंमत १,१०,०००/- रू तसेच वाहन क्रमांक एम.एच.२७.बि.डी.२२७८ किंमत ६,५०,०००/- रू असा एकुण ७,७०,०००/- स्पयाचा मुददेमाल पंचासमक्ष जप्त केला व गोवंश जातीचे
जनावरे सुरक्षा व देखभाल कामी गौरक्षण संस्था अकोट येथे खाना करण्यात आले.
फिर्यादी पोहेकों प्रमोद चव्हाण ब.न. १९१७ पोलीस स्टेशन हिवरखेड यांनी दिलेल्या लेखी रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन हिवरखेड जि. अकोला येथे अपराध कक्रमांक २४४/२०२५ कलम ५,५ (अ),९,९ (अ) प्राणी संरक्षण अधिनियम सहकलम ११ प्राणी संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करुन तपासात घेतला. सदर गुन्हयातील आरोपी नाने नदीम खान उर्फ राजा दस्तगीर खान वय ४० वर्ष रा.अडगाव बु यास अटक करून पुढील तपास पोहेकॉ योगेश इंगळे ब.न.६७९ पोलीस स्टेशन हिवरखेड हे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे