जालना, 31 ऑगस्ट (हिं.स.)
जालना समृद्धी महामार्गावर वाहनांतून डिझेल चोरी करणाऱ्या तिघांना जालनाच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे. त्यांच्या ताब्यातून ३१, ००० रूपये किंमतीचे तीन मोबाईल जप्त करण्यात आलेले आहे.
समीर नूर मोहम्मद मेव, हनीफ मुंशी हुसेन खान, अजिज खान अशी या तिघांची नावे असून त्यांनी समृद्धी महामार्गावर गुंडेवाडी पेट्रोल पंपाजवळ ट्रक चालकास तलवारीचा धाक दाखवून 100 लिटर डिझेल चोरी केली होती. त्यानुसार चंदनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या आरोपींकडून यापूर्वी करण्यात आलेल्या दोन डिझेल चोरीच्या घटना देखील कबूल केले आहे.
जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / KULKARNI AMIT ANIL