सोलापूर : तीन परप्रांतीय तोतया डॉक्टरांना अटक
सोलापूर,31ऑगस्ट(हिं.स.)वैद्यकीय शिक्षण घेतल्याची पदवी नसतानाही आपण डॉक्टर असल्याचे म्हणून घेत रोपळेत रुग्णांवर उपचार करणार्‍या तिघा तोतयांना पोलिसांनी अखेर अटक केली. परप्रांतीय असणार्‍या या तिन्ही तोतयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन-चार लोक वै
सोलापूर : तीन परप्रांतीय तोतया डॉक्टरांना अटक


सोलापूर,31ऑगस्ट(हिं.स.)वैद्यकीय शिक्षण घेतल्याची पदवी नसतानाही आपण डॉक्टर असल्याचे म्हणून घेत रोपळेत रुग्णांवर उपचार करणार्‍या तिघा तोतयांना पोलिसांनी अखेर अटक केली. परप्रांतीय असणार्‍या या तिन्ही तोतयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन-चार लोक वैद्यकीय शिक्षण नसतानाही रुग्णांवर रोपळेत उपचार करत आहेत. त्यानुसार पोलिसांनी गावात संबंधितांवर छापा टाकला. त्या ठिकाणी गोविंदा देवी राम प्रजापती (वय 26, रा. भरतपूर, राजस्थान), झहीर खान (वय 22, रा. पलवल, हरियाणा), आसिफ दिन मोहम्मद (रा. भरतपूर, राजस्थान) हे तिघे उपचार करताना आढळले. त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षणाचा कोणताही पुरावा मिळाला नाही. तरीही ते स्वतः आपण डॉक्टर असल्याचे म्हणवून घेत रुग्णांवर उपचार करत होते. त्यांच्याकडील इंजेक्शनसाठीच्या औषधाच्या बाटल्या, गोळ्या व इतर साहित्य जप्त केले.

तालुक्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर, सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील, उपनिरीक्षक विक्रम शेठ वडणे, हेडकॉन्स्टेबल स्वप्निल वाडदेकर, साजन भोसले, इरफान शेख, घोंगाणे, चालक घाडगे, नदाफ, चाटे यांच्या पथकाने कारवाई केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande