अमरावती : गांजा विक्रेत्याला 3 वर्ष सश्रम कारावास
अमरावती, 30 ऑगस्ट (हिं.स.) : गांजा विक्री प्रकरणात एका आरोपीस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी तीन वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड. दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. विधी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गज
अमरावती : गांजा विक्रेत्याला 3 वर्ष सश्रम कारावास


अमरावती, 30 ऑगस्ट (हिं.स.) : गांजा विक्री प्रकरणात एका आरोपीस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी तीन वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड. दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. विधी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन भीमराव उमेकर (६५, रा. रेवसा, अमरावती) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गजानन उमेकर हा राहत्या घरी अवैधरीत्या गांजा विक्री करत असल्याची माहिती वलगाव पोलिसांना मिळाली. त्या आधारावर वलगावचे तत्कालीन पोलिस निरीक्षक बाबाराव अवचार यांच्या नेतृत्वात पोलिसांनी ३ मे २०२० रोजी दुपारी एक वाजता गजानन उमेकरच्या घरी धाड टाकली. या कारवाईत गजानन उमेकरच्या घरातून पोलिसांनी ११०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिस निरीक्षक बाबाराव अवचार यांच्या तक्रारीवरून गजानन उमेकरविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. तपासाअंती दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यातआले. या प्रकरणात न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या न्यायालयात सात साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. साक्षीदारांची साक्ष व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने गजानन उमेकरला तीन वर्षे सश्रम कारावास, २५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील गजानन खिल्लारे व मंगेश भागवत यांनी युक्तिवाद केला आहे. ---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande