एआय वापरुन मुख्यमंत्र्यांचा अश्लील व्हिडीओ प्रसारित, धुळ्यात गुन्हा दाखल
धुळे, 30 ऑगस्ट (हिं.स.) एका इन्स्टाग्राम आयडीधारकाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी श्रीमती अमृता फडणवीस यांच्या छायाचित्राचा एआय तंत्रज्ञानाचा वापर करून दोघांचे चुंबन घेणारे अश्लील चित्रीकरण प्रसारित केल्याच्या आरोपाखाली धुळे सायबर
एआय वापरुन मुख्यमंत्र्यांचा अश्लील व्हिडीओ प्रसारित, धुळ्यात गुन्हा दाखल


धुळे, 30 ऑगस्ट (हिं.स.) एका इन्स्टाग्राम आयडीधारकाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी श्रीमती अमृता

फडणवीस यांच्या छायाचित्राचा एआय तंत्रज्ञानाचा वापर करून दोघांचे चुंबन घेणारे अश्लील चित्रीकरण प्रसारित केल्याच्या आरोपाखाली धुळे सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी खुद्द आ.अनुप अग्रवाल यांनी स्वत; पोलिसांत फिर्याद दिली आहे. आ.अग्रवाल यांनी अवघ्या काही वेळातच सायबर पोलिसांशी संपर्क साधून सबंधित इंस्टाग्राम आयडीधारकाच्या विरुद्ध लेखी फिर्याद दिली आहे.

या फिर्यादीनुसार अलचीमुलगी असे संशयित आयडीधारकाचे नाव आहे.आयडीधारकाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी श्रीमती अमृता फडणवीस यांच्या छायाचित्रांचा वापर करून एआय या नव्या तंत्रज्ञानाच्या वापरातून संपादन (एडिटिंग) करून दोघांच्या चुंबनाचे अश्लील चित्रीकरण प्रसारित करून बदनामी केली. पोलिसांनी संबंधित आयडीधारकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३५६(२) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम. २००९ चे कलम ६७(अ) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande