पालघर जिल्ह्यात २१ सप्टेंबर ते २५ डिसेंबरदरम्यान खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन
पालघर, 30 ऑगस्ट (हिं.स.)। पालघर जिल्ह्यात २१ सप्टेंबर ते २५ डिसेंबरदरम्यान “खासदार क्रीडा महोत्सव २०२५” चे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. याबाबत खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्
पालघर जिल्ह्यात २१ सप्टेंबर ते २५ डिसेंबरदरम्यान खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन


पालघर, 30 ऑगस्ट (हिं.स.)।

पालघर जिल्ह्यात २१ सप्टेंबर ते २५ डिसेंबरदरम्यान “खासदार क्रीडा महोत्सव २०२५” चे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. याबाबत खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार देशभरात राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण व शहरी भागातील तरुणांना क्रीडाक्षेत्रात संधी उपलब्ध करून देणे व त्यांना राष्ट्रीय स्तरावर पोहोचवणे हा आहे.

या महोत्सवात कबड्डी, खो-खो, फुटबॉल, व्हॉलीबॉल, कुस्ती, ऍथलेटिक्स, बॅडमिंटन, मॅरेथॉन, मल्लखांब, टेबल टेनिस, योगासन यांसोबतच आदिवासी पारंपरिक खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. प्राथमिक फेऱ्या तालुका स्तरावर होतील, त्यानंतर जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर सामने पार पडणार आहेत.

डॉ. सवरा म्हणाले, “क्रीडा आरोग्यासोबत आत्मविश्वास, शिस्त आणि बंधुभाव वाढवतात. पालघर जिल्ह्यातील युवक-युवतींनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.”

या आयोजनासाठी प्रशासन, शैक्षणिक संस्था, सामाजिक व क्रीडा संघटनांचे सहकार्य मिळणार असून स्पर्धकांना नोंदणीसाठी अधिकृत संकेतस्थळ www.sansadkhelmahotsav.in उपलब्ध करून देण्यात आले आहे. ग्रामीण भागातील दडलेली क्रीडा प्रतिभा या माध्यमातून उजेडात येईल, असा विश्वास खासदारांनी व्यक्त केला.

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande