हरारे, ३१ ऑगस्ट (हिं.स.). हरारे येथे झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी श्रीलंकेच्या क्रिकेट संघाला मॅच फीच्या पाच टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. आयसीसी एलिट पॅनेल मॅच रेफरी जेफ क्रो यांनी हा दंड ठोठावला आहे. खेळाडू आणि खेळाडूंच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.२२ नुसार, किमान ओव्हर-रेट गुन्ह्यांशी संबंधित खेळाडूंना निर्धारित वेळेत न टाकलेल्या प्रत्येक षटकासाठी त्यांच्या मॅच फीच्या पाच टक्के दंड ठोठावला जातो.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सांगितले की, श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंका यांनी गुन्हा आणि प्रस्तावित दंड स्वीकारला आहे. त्यामुळे औपचारिक सुनावणीची आवश्यकता नाही. हरारे येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने यजमान झिम्बाब्वेचा 7 धावांनी पराभव केला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने ५० षटकांत ६ गडी गमावून २९८ धावा केल्या. श्रीलंकेने ठेवलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ ५० षटकांत ८ गडी गमावून केवळ २९१ धावा करू शकला होता. या विजयासह श्रीलंके दोन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे