दुलीप ट्रॉफी : मोहम्मद अझरुद्दीनकडे उपांत्य फेरीत दक्षिण विभागाच्या नेतृत्वाची धुरा
बंगळुरु, 31 ऑगस्ट (हिं.स.) बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे ४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीसाठी केरळचा फलंदाज मोहम्मद अझरुद्दीनला तिलक वर्माच्या जागी दक्षिण विभागाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तिलक वर्माला याप
मोहम्मद अझहरुद्दीन


बंगळुरु, 31 ऑगस्ट (हिं.स.) बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे ४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीसाठी केरळचा फलंदाज मोहम्मद अझरुद्दीनला तिलक वर्माच्या जागी दक्षिण विभागाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तिलक वर्माला यापूर्वी दक्षिण विभागाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. पण आशिया कपसाठी त्यांची भारतीय संघात निवड झाली आहे आणि त्यामुळे ते पुढे दुलीप करंडक स्पर्धेत खेळू शकणार नाही.

अझरुद्दीन तिलक वर्मा यांच्यासोबत संघाचा उपकर्णधार होता. आणि आता ही भूमिका तामिळनाडूच्या एन जगदीसनकडे सोपवण्यात आली आहे. तामिळनाडूचा डावखुरा फिरकी गोलंदाज साई किशोर देखील उपांत्य फेरीत खेळणार नाही. कारण तो अजूनही हाताच्या दुखापतीतून सावरत आहे. पुडुचेरीचा अंकित शर्मा आणि आंध्रचा शेख रशीद यांना दुलीप करंडकातील शेवटच्या चार सामन्यांसाठी दक्षिण विभागाच्या संघात समावेश करण्यात आले आहे. या दोन्ही क्रिकेटपटूंना यापूर्वीच स्टँडबायवर ठेवण्यात आले होते. अंकित हा डावखुरा फिरकी गोलंदाज आहे ज्याने ६८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये १६८ विकेट्स घेतल्या आहेत. रशीद हा एक टॉप ऑर्डर फलंदाज आहे ज्याने १९ रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये १२०४ धावा केल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande