टी-२० तिरंगी मालिकेत पाकिस्तानचा सलग दुसरा विजय
अबू धाबी, 31 ऑगस्ट, (हिं.स.) पाकिस्तान क्रिकेट संघाने यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-२० तिरंगी मालिकेत सलग दुसरा विजय नोंदवला. पाकिस्ताने यूएईचा ३१ धावांनी पराभव केला. त्यापूर्वी त्यांनी आपल्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला होता. पाकिस्ता
पाकिस्तान क्रिकेट संघ


अबू धाबी, 31 ऑगस्ट, (हिं.स.) पाकिस्तान क्रिकेट संघाने यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-२० तिरंगी मालिकेत सलग दुसरा विजय नोंदवला. पाकिस्ताने यूएईचा ३१ धावांनी पराभव केला. त्यापूर्वी त्यांनी आपल्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला होता.

पाकिस्तानकडून सैम अयुब आणि हसन नवाज यांनी अर्धशतके झळकावली. याशिवाय फहीम अशरफ आणि हसन अली यांनीही वेगवान खेळी करत पाकिस्तानची धावसंख्या २०७ धावांवर नेला. जी टी-२० मधील पाकिस्तानची तिसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. यूएईकडून आसिफ खानने ३५ चेंडूत ७७ धावांची तुफानी खेळी केली. पण त्याची ही खेळी व्यर्थ ठरली.

नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि सलामीवीर साहिबजादा फरहान लवकरच परतला. यानंतरफखर जमाननेही फक्त ६ धावा करून आपली विकेट गमावली. कर्णधार सलमानलाही फक्त ५ धावा करता आल्या. सईम अयुबने एक बाजू लावून धरत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने फक्त २५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. आणि ३८ चेंडूत ६९ धावांची खेळी खेळून संघाला संकटातून बाहेर काढले. या खेळीत ४ षटकार आणि ७ चौकारांचा समावेश होता.दुसऱ्या बाजूने अयुबला हसन नवाजची साथ मिळाली. नवाजने फक्त २६ चेंडूत ५६ धावा केल्या. नवाजने त्याच्या खेळीत २ चौकार आणि ६ षटकार मारले. दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी २५ चेंडूत ५७ धावांची भागीदारी झाली. तळाचे फलंदाज मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ आणि हसन अली यांनी शेवटच्या चार षटकात ४५ धावा जोडून धावसंख्या २०७ पर्यंत नेली.

लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या यूएई संघाकडून आसिफ खानने ३५ चेंडूत ७७ धावांची शानदार खेळी केली. पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. संघाचा कर्णधार मोहम्मद वसीमनेही १८ चेंडूत ३३ धावांची आक्रमक खेळी केली. त्याने संघाला चांगली सुरुवात दिली आणि पॉवरप्लेमध्ये युएईने ३३ धावा केल्या. दुसरीकडे पाकिस्तानसाठी हसन अली आणि मोहम्मद नवाज यांनी मिळून अर्ध्या संघाला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पाकिस्तानचा विजय निश्चित केला. हसनने ३ तर नवाजने २ विकेट्स घेतल्या.

-------------------------

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande