पुणे फेस्टिव्हलमध्ये गोल्फ कप स्पर्धा उत्साहात संपन्न
पुणे, 30 ऑगस्ट (हिं.स.)। ३७व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही ''पुणे फेस्टिव्हल गोल्फ कप टूर्नामेंट'' आज संपन्न झाली. यामध्ये १८० हून अधिक नामवंत सहभागी झाले होते. त्यामध्ये अनेक कंपन्यांचे सीईओ व वरिष्ठ अधिकारी तसेच परदेशी पाहुणे स
पुणे


पुणे, 30 ऑगस्ट (हिं.स.)।

३७व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही 'पुणे फेस्टिव्हल गोल्फ कप टूर्नामेंट' आज संपन्न झाली. यामध्ये १८० हून अधिक नामवंत सहभागी झाले होते. त्यामध्ये अनेक कंपन्यांचे सीईओ व वरिष्ठ अधिकारी तसेच परदेशी पाहुणे सहभागी झाले होते. सकाळी ६.३० वाजता पुणे गोल्फ टूर्नामेंटचे कॅपटन कार्तिकीयन यांनी स्पर्धेचा प्रारंभ केला. यावेळी आय आय एफ एल चे डॉ. गौरव कुलश्रेष्ठा उपस्थित होते.

ही स्पर्धा स्टेबलफोर्ड प्रकारातील हँडीकॅप डिव्हिजनमध्ये गोल्ड व सिल्व्हर गटामध्ये झाली. यामध्ये बेस्ट लॉंगेस्ट ड्राइव्ह, स्ट्रेटेस्ट ड्राइव्ह आणि क्लोजेस्ट टू पिन विजेत्यांना विशेष पारितोषिकाने गौरवले गेले. याबरोबरच गोल्ड विभागात डॉ. सचिन रुहानी या विजेत्याला पुणे फेस्टिव्हल रोलिंग ट्रॉफी दिली गेली.

पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड आणि पुणे फेस्टिव्हल क्रीडा समितीचे प्रमुख प्रसन्न गोखले तसेच आ. बापू पठारे यांनी खेळाडूंना भेटून शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे –

१. गोल्ड डिव्हिजन हँडीकॅप

विजेते - डॉ. सचिन रुहानी

१st रनर अप - ओमकार देसाई

२nd रनर अप – अंकित मिश्रा

२. सिल्व्हर डिव्हिजन हँडीकॅप

विजेते – सुरज काकतकर

१st रनर अप – रवी मंधाना

२nd रनर अप – जतीन भाना

३. क्लोजेस्ट टू द पिन ऑन होल नं २

१. विजेते – नीरज गुलाटी

४. क्लोजेस्ट टू द पिन ऑन होल नं १६

विजेते - नितेश शिंदे

5. स्ट्रेटेस्ट ड्राइव्ह ऑन होल नं १४

विजेते – अमित कोठारी

६. लॉंगेस्ट ड्राइव्ह ऑन होल नं ३ (पुरुष)

विजेते - लिओन झकेरियास

७. लॉंगेस्ट ड्राइव्ह ऑन होल नं ३ (महिला)

विजेती - व्हान्या सिंग

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande