पुणे, 30 ऑगस्ट, (हिं.स.)।
३७व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुकुंदनगर येथील झांबरे पॅलेस येथे झालेल्या स्पर्धेत वविध गटात २२५ स्पर्धकांनी भाग घेतला होता. झांबरे पॅलेसचे श्री. बाबासाहेब झांबरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले, ५ वयोगटांत (८ वर्षे, १० वर्षे, १२ वर्षे, १५ वर्षे व खुला गट) अशा गटात ही स्पर्धा घेतली गेली. या स्पर्धेचे समन्वयक पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव राजेंद्र कोंडे हे होते. सायंकाळी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला त्यावेळी पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड, सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक डॉ. सतीश देसाई, पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव राजेंद्र कोंडे उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे :
खुला गट विजेते –
यश वाठारकर – २५००रु + सन्मानचिन्ह
उपविजेते
ओमकार कडाव – १५००रु + सन्मानचिन्ह
सुयोग वडके – १००० रु. + सन्मानचिन्ह
उत्तेजनार्थ बक्षिसे –
दीपांकर कांबळे, दगडू गायकवाड, आशिष संकलेचा, विक्रम सिंग
महिला खुला गट :
विजेते
राजेश्वरी देशमुख – १००० रु. + सन्मानचिन्ह
उपविजेती
अनुष्का गांधी ४००रु + मेडल
५० वर्षांवरील वयोगट
विजेते
गोवर्धन वसवे १००० रु. + सन्मानचिन्ह
उपविजेते
चंद्रकांत डोंगरे ४०० + मेडल
याशिवाय उर्वरित सर्व गटात सर्व विजेते उपविजेते व उत्तेजनार्थ अशी बक्षिसे देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर