राज्य कार्फबॉल अजिंक्यपद स्पर्धा : सातारा, पुणे, अहिल्या नगर संघांची विजयी सलामी
नाशिक, 30 ऑगस्ट (हिं.स.) : नाशिकच्या पंचवटी येथील मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे येथे आयोजित २४ व्या वरिष्ठ गट कार्फबॉल स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरवात झाली. या स्पर्धेमध्ये नागपूर, पुणे, मुंबई, ठाणे, सोलापूर, छ.संभाजी नगर, परभणी, बीड, धु
२४ वी वरिष्ठ राज्य कार्फबॉल अजिंक्यपद स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरवात. ,सातारा, पुणे, अहिल्या नगर संघांची विजयी सलामी.


नाशिक, 30 ऑगस्ट (हिं.स.) : नाशिकच्या पंचवटी येथील मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे येथे आयोजित २४ व्या वरिष्ठ गट कार्फबॉल स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरवात झाली. या स्पर्धेमध्ये नागपूर, पुणे, मुंबई, ठाणे, सोलापूर, छ.संभाजी नगर, परभणी, बीड, धुळे, जळगांव, अमरावती, यवतमाळ, आलेला, वर्धा, चंद्रपूर, बुलढाणा, नांदेड, दातार, सांगली, नंदुरबार, जालना, अहिल्या नगर, गोंदिया, भंडारा, आणि नाशिक या विविध जिल्ह्याच्या संघातली २७० खेळाडू सहभागी झाले आहेत.

या स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे कालिका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशवअण्णासा पाटील आणि क्रीडा संघटक चंद्रकांत बनकर यांचे हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी डॉक्टर प्रवीण मानवटकर, डॉक्टर अजय सोनटक्के, अशोक दुधारे, सुधीर कहाते, विलास वाघ, राजू शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन या स्पर्धेचे आयोजन प्रमुख अविनाश वाघ यांनी केले. सर्व खेळाडूंचे आणि मान्यवरांचे स्वागत आणि प्रास्ताविक डॉक्टर गौतम जाधव यांनी केले.

उदघाटनानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. चार गटांमध्ये विभागणी केलेल्या या स्पर्धेमध्ये या चार गटामध्ये साखळी पद्दतीने सामने खेळविले जात आहेत. यामध्ये जळगांव विरद्ध सातारा हा पहिला सामना खेळविला गेला यामध्ये सातारा संघाच्या खेळाडूंनी सुंदर खेळ करत हा सामना ६-२ असा जिंकून विजयी सुरवात केली. ब गटामध्ये खेळविल्या गेलेल्या सामन्यात अहिल्या नगर संघाने पुणे संघावर ७-३ अशी चार गुणांनी मात करत विजय संपादन केला. 'क गटामध्ये पुणे संघाने यजमान नाशिक संघावर ८-२ असा मोठा विजय मिळवत पुढे आगेकूच केली.

या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड केली जाणार आहे. हा निवड झालेले संघ राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधत्व करेल अशी माहिती आयोजकांनी दिली.

आजचे निकाल :-

१) सातारा विजयी विरुद्ध जळगांव ६ -२

२) अहिल्यानगर विजयी विरुद्ध पुणे शहर ७-३

३) पुणे जिल्हा विजयी विरुद्ध नाशिक ८-२

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande