येवला, 31 ऑगस्ट (हिं.स.)येवला राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.० अंतर्गत राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या २ कोटी ३१ लाख रुपयांच्या बायोमायनिंग प्रकल्पास प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. या प्रकल्पांतर्गत येवला नगरपरिषद क्षेत्रातील साठविलेल्या ४२ हजार ०११ मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे येवला शहर अधिक स्वच्छ सुंदर होण्यास मदत होणार आहे.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० च्या धर्तीवर राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० ची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत राज्यातील सर्व शहरे कचरामुक्त करण्याचे मुख्य उद्दिष्ट असून या अंतर्गत शहरातील सर्व प्रकारच्या घनकचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन व शाश्वत स्वच्छता आणि वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करणे या बाबींचा समाविष्ट आहे.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे घनकचरा व्यवस्थापन घटकांमधील जुन्या साठलेल्या कचऱ्यावर बायोमायनिंग करण्याबाबतच्या मान्यता मिळाली आहे. त्यानुसार येवला नगरपालिकेत देखील ही योजना राबविण्यात यावी याबाबत मंत्री छगन भुजबळ यांचा पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार येवला नगरपरिषद क्षेत्रातील साठविलेल्या ४२ हजार ०११ मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. यासाठी २ कोटी ३१ लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.० अंतर्गत येवला नगरपालिका क्षेत्रात साठविलेल्या ४२ हजार ०११ मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी २ कोटी ३१ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये केंद्र सरकारकडून १ कोटी १५ लाख रुपये निधी मिळणार आहे. तर राज्य सरकारच्या वतीने ९२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. तर येवला नगरपालिकेचा २३ लाख रुपयांचा निधी असणार आहे.या प्रकल्पामुळे येवल्यातील कचऱ्यावर प्रक्रिया होऊन कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होणार आहे. यामुळे येवला शहर अधिक स्वच्छ सुंदर होण्यास मदत होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV