अमरावती : विसर्जनाकरिता भक्तांना प्रशासनाने सोडले वाऱ्यावर
अमरावती, 3 सप्टेंबर (हिं.स.) : अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे गणेश विसर्जनासाठी पोलिस आणि प्रशासनाकडून नदीकाठी व्यवस्था करण्यातआलेली नाही. त्यामुळे चंद्रभागा नदीत गौरी-गणपती विसर्जनासाठी आलेल्या भाविकांना मोठ्या गैरसोईचा सामना करावा लागला. राज्य
चंद्रभागा नदीकाठी बाप्पांच्या विसर्जनाकरिता भक्तांना प्रशासनाने सोडले वाऱ्यावर


अमरावती, 3 सप्टेंबर (हिं.स.) : अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे गणेश विसर्जनासाठी पोलिस आणि प्रशासनाकडून नदीकाठी व्यवस्था करण्यातआलेली नाही. त्यामुळे चंद्रभागा नदीत गौरी-गणपती विसर्जनासाठी आलेल्या भाविकांना मोठ्या गैरसोईचा सामना करावा लागला.

राज्यामध्ये गणपती बाप्पा विराजमान झाले आहे. अशातच काही भाविक भक्त आपल्या घरी दीड दिवसाचे,अडीच दिवसाचे, पाच दिवसाचे, सात दिवसाचे तसेच दहा दिवसाचे व सार्वजनिक गणपती बाप्पा यांची स्थापना करतात, तत्पश्चात त्यांचं विसर्जन सुद्धा करतात. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे नदी-नाले भरून वाहत आहे. अशातच बाप्पाचं विसर्जन नदीमध्ये करण्याचे म्हटलं तर खूप वेळा भाविक भक्तांना आपला जीव गमवावा लागला आहे. ज्यामुळे संबंधित प्रशासन बाप्पांचं विसर्जन करणाऱ्या ठिकाणी बंदोबस्त किंवा कर्मचारी तैनात करतात. मात्र दर्यापूर तालुक्यातील खल्लार गावामधाल्या एका भाविक भक्ताच्या घरी अडीच दिवसाकरिता गणपती बाप्पांची स्थापना करण्यात आली होती, त्यांच्या विसर्जनाकरिता भाविक भक्त चंद्रभागा नदीपात्रावरील पूल ओलांडून पलीकडे नदीकाठी आले होते, परंतु यावेळी संबंधित प्रशासनाचे एकही कर्मचारी बंदोबस्ताकरिता किंवा मार्गदर्शनाकरिता या ठिकाणी दिसून आले नाही. एकीकडे या नदीवरील असलेल्या पुलाला दोन्हीकडून कसल्याच प्रकारचे बॅरिगेट्स नाही, ज्यामुळे पाय घसरून नदीमध्ये पडून वाहून जाण्याचा संकट मोठ्या प्रमाणात उभा ठाकत आहे. दुसरीकडे चंद्रभागा नदी दोन्ही काठ भरून वाहत आहे,अशातच विसर्जनाच्या वेळी विसर्जन यात्रेत मुले, वृद्ध नागरिक सामील होते. मात्र संबंधित प्रशासनाकडून असली घोडचूक दिसून आल्यामुळे उर्वरित पुढील विसर्जनाच्या वेळी योग्य तो बंदोबस्त प्रशासनाने ठेवावा अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहे. ---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande