अकोला, 31 ऑगस्ट (हिं.स.)।
रामदास पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील उत्तमचंद प्लॉट परिसरात मोठ्या प्रमाणात गोवंश मांस विक्री होत असल्याची माहिती विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे कार्यकर्त्यांनी तात्काळ रामदास पेठ पोलिसांना संपर्क साधला.
यानंतर पोलिस कर्मचारी व कार्यकर्त्यांनी संयुक्तपणे परिसरात धाड टाकली. धाडीतून १०० ते १५० किलोपर्यंत गोवंश मांस ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळी मांस विक्री करत असलेल्या व्यक्तीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले.
जप्त केलेले मांस व आरोपीसह पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले असून, रामदास पेठ पोलीस पुढील तपास व कारवाई करत आहेत. या कारवाईनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या भागात काही दिवसांपासून संशयास्पद हालचाली दिसून येत होत्या. अखेर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या तक्रारीमुळे हे प्रकरण उघडकीस आले.
दरम्यान, गोवंश मांस विक्री हा कायद्याने गुन्हा असून, आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे