लातूर, 1 सप्टेंबर (हिं.स.)।बप्पा गणेश मंडळाचे पथनाट्याद्वारे नवा नरक “वाहतुकीच्या नियमावर जणजागृती” तसेच सोशल मीडियाच्या प्रादुर्भावावर मुलांमध्ये जनजागरण करण्यात आले
समाज, संस्कृती, आध्यत्म, आरोग्य आणि शिक्षण या पंचसुत्रीवर जणजागृती करणारा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ “उत्सवाचा मानबिंदू” असलेल्या लातूरच्या बप्पा गणेश मंडळाच्या वतीने वाहतूक नियमांची जनजागृती करणारे “नवा नरक” पथनाट्य शहरातील विविध भागांमध्ये सादर केले जात असून नागरिकांच्या विद्यार्थी मित्रांच्या कौतुकास पात्र ठरत आहे.यमाची भूमिका साकारणारे मंडळाचे उपाध्यक्ष कुमार चोथवे तर चित्रगुप्ताची भूमिका साकारणारे शिवदर्शन राचट्टे हे आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis