रत्नागिरी, 1 सप्टेंबर, (हिं. स.) : खेडचे माजी नगराध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. मत्स्य आणि बंदरविकास मंत्री नीतेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
येत्या चार सप्टेंबरला मुंबई भाजप कार्यालयात पक्षप्रवेश कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. श्री. राणे यांनी आज खेडमध्ये खेडेकर यांची भेट घेऊन त्यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकार परिषद घेतली.राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून त्या पक्षात असलेले खेडेकर यांना गेल्या आठवड्यात पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवून मनसेतून बडतर्फ करण्यात आले होते. आता ते भारतीय जनता पक्षात दाखल होणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी