मंत्र्यांच्या उपस्थितीत छ. संभाजीनगरात भटके विमुक्त दिन साजरा
छत्रपती संभाजीनगर, 31 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, राज्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे आणि भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या उपस्थितीत
भटके विमुक्त दिन


छत्रपती संभाजीनगर, 31 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, राज्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे आणि भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या उपस्थितीत आज रविवारी ३१, ऑगस्ट, भटके-विमुक्त दिन इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते प्रारंभी दिपपूजन करण्यात आले.

या प्रसंगी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

भविष्यात या विद्यार्थ्यांनी समाज आणि देशाच्या प्रगतीसाठी मोठे योगदान द्यावे, ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande