छत्रपती संभाजीनगर, 31 ऑगस्ट (हिं.स.)। एन-9 हडको मृत्युंजय गणेश मंडळाच्या वतीने सादर करण्यात आलेला ‘ऑपरेशन सिंदूर’ हा देखावा अतिशय उत्कृष्ट, प्रेरणादायी आणि सामाजिक संदेश देणारा आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील राज्यसभा खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी एन-9 हडको मृत्युंजय गणेश मंडळ येथे सदिच्छा भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. मंडळातील सर्व कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
गणरायाच्या कृपाशिर्वादाने समाजात जागरूकता, ऐक्य आणि सकारात्मकता नांदो, तसेच सर्व गणेशभक्तांना मंगलमय गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis