अफगाणिस्तान भूकंपातील मृतांची संख्या आता १४०० पार
काबूल, 2 सप्टेंबर (हिं.स.)।अफगाणिस्तानातील जलालाबादजवळ रविवारी रात्री ६.० तीव्रतेचा भूकंप झाला. अफगाणिस्तानातील या भूकंपात मृतांचा आकडा आता १४११ वर पोहोचला आहे, तर जखमींची संख्या ३२५० पेक्षा जास्त झाली आहे. याबाबतची माहिती तालिबानने दिली आहे. तालिबान
अफगाणिस्तान भूकंप


काबूल, 2 सप्टेंबर (हिं.स.)।अफगाणिस्तानातील जलालाबादजवळ रविवारी रात्री ६.० तीव्रतेचा भूकंप झाला. अफगाणिस्तानातील या भूकंपात मृतांचा आकडा आता १४११ वर पोहोचला आहे, तर जखमींची संख्या ३२५० पेक्षा जास्त झाली आहे. याबाबतची माहिती तालिबानने दिली आहे. तालिबान सरकारने जगभरातून मदत मागितली आहे. यानंतर, भारताने मदतीसाठी काबूलला १००० तंबू पाठवले आहेत. तसेच, काबूलहून कुनारला १५ टन अन्नपदार्थ पाठवण्यात आले आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी एक्स वर लिहिले की, भारत मदत साहित्य पाठवत राहील. २०२१ मध्ये तालिबान सरकार स्थापन झाल्यानंतर, आंतरराष्ट्रीय संस्थांनी अफगाणिस्तानला मानवतावादी मदत थांबवली.अफगाणिस्तानच्या आवाहनानंतर भारताव्यतिरिक्त चीन आणि ब्रिटनसारख्या देशांनीही मदत पाठवली आहे. भूकंपामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना मदत करण्यासाठी ब्रिटनने १ दशलक्ष पौंड (१० कोटी) च्या आपत्कालीन निधीची घोषणा केली आहे. त्याच वेळी, चीनने सांगितले की, ते अफगाणिस्तानला त्यांच्या गरजा आणि क्षमतेनुसार मदत करेल. अफगाणिस्तानातील भूकंपाबद्दल पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त म्हणाले कि,मी या कठीण काळात आमच्या सवेंदना आणि प्रार्थना पीडित कुटुंबासोबत आहेत. जखमींना लवकर बरे वाटेवर हि आमची इच्छा. भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. तर संयुक्त राष्ट्रांनीही मृतांबद्दल शोक व्यक्त केला आहे. संयुक्त राष्ट्रांनी सांगितले की, आमचे पथक आधीच मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणनुसार, भूकंपाचा धक्का नांगरहार प्रांतात बसला, जो जलालाबाद शहरापासून सुमारे १७ मैल अंतरावर आहे आणि २ लाख लोकसंख्या आहे. जिथे अनेक गावे मोडकळीस आली. हा परिसर राजधानी काबूलपासून १५० किमी अंतरावर आहे. हा डोंगराळ भाग आहे. जो भूकंपांसाठी रेड झोन मानला जातो. जिथे मदत पोहोचवणे देखील कठीण आहे. अहवालानुसार, बहुतेक मृत्यू शेजारच्या कुनार प्रांतात झाले आहेत. सोमवारी(दि.१) येथे ४.६ तीव्रतेचा आणखी एक भूकंप झाला. वृत्तानुसार, भूकंपाचे धक्के पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा आणि पंजाब प्रांतातही जाणवले. त्याच वेळी, भारतातील गुरुग्राममध्येही सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande