अमेरिका खूप शक्तिशाली देश, अमेरिकेशिवाय जगात काहीच उरणार नाही - ट्रम्प
वॉशिंग्टन , 3 सप्टेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेताना दिसले. ट्रम्प यांनी मंगळवारी (२ सप्टेंबर) सांगितले की, अमेरिका खूप शक्तिशाली देश आहे आणि त्याशिवाय जगात काहीच उरणार नाही. पं
ट्रम्प


वॉशिंग्टन , 3 सप्टेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेताना दिसले. ट्रम्प यांनी मंगळवारी (२ सप्टेंबर) सांगितले की, अमेरिका खूप शक्तिशाली देश आहे आणि त्याशिवाय जगात काहीच उरणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चीन दौऱ्यानंतर भारतावर लावण्यात आलेल्या टॅरिफवर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली.

ट्रम्प म्हणाले की, भारत जे काही उत्पादन करत होता, ते अमेरिका पाठवत होता, पण १०० टक्के टॅरिफमुळे आम्ही भारतात काहीच पाठवू शकत नव्हतो.

ओव्हल ऑफिसमधून एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना ट्रम्प म्हणाले, “आम्ही भारतासोबत फारसा व्यापार करत नव्हतो, पण ते आमच्यासोबत सतत व्यापार करत होते, कारण आम्ही त्यांच्याकडून कोणताही टॅरिफ घेत नव्हतो. ही मोठी मूर्खता होती. त्यांनी जे काही बनवलं, ते सगळं अमेरिकन बाजारात पाठवलं. ते इथे मोठ्या प्रमाणात हावी झालं आणि आम्ही त्यांना काहीही पाठवत नव्हतो. ते आमच्याकडून १०० टक्के टॅरिफ घेत होते.”

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “अमेरिकेशिवाय जगात काहीही शिल्लक राहणार नाही. अमेरिका अतिशय मोठा आणि शक्तिशाली देश आहे. मी पहिल्या काही वर्षांत अमेरिकेला खूप मजबूत केलं आहे. मी जगात अनेक युद्धं थांबवली आहेत आणि ती युद्धं व्यापाराच्या जोरावर थांबली आहेत. व्यापारात टॅरिफ खूप महत्त्वाचं ठरतं.” ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर लावलेल्या टॅरिफला योग्य ठरवलं. त्यांनी सांगितलं की, टॅरिफमुळे अमेरिकेतील नोकऱ्या वाचतील.

अमेरिकेने भारतावर आधी २५ टक्के टॅरिफ लावलं होतं, पण त्यानंतर त्यात आणखी २५ टक्क्यांची वाढ करून एकूण ५० टक्के टॅरिफ लावण्यात आलं. ट्रम्प यांनी आधीच सांगितलं होतं की, भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, पण भारताने आपल्या रशियासोबतच्या व्यापार संबंधांमध्ये कोणताही बदल केला नाही. याच कारणामुळे ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावलं.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande