पालघरमध्ये मालकीणीने कामगारांवर गाडी चढवली
पालघर, 5 ऑगस्ट (हिं.स.)। पालघर जिल्हातील वेवूर येथील मस्तान टॅंक इंटरप्राईजेस या कंपनीच्या गेटवर आंदोलन करणाऱ्या कामगारांना चिरडण्याचा प्रयत्न मंगळवारी खुद्द कंपनीच्या वयोवृद्ध मालकीणीने केला. कंपनीच्या बाहेर आंदोलन करणाऱ्या कामगारांवर या वयोवृद्
पालघरमध्ये  कामगारांवर गाडी चढवली


पालघर, 5 ऑगस्ट (हिं.स.)। पालघर जिल्हातील वेवूर येथील मस्तान टॅंक इंटरप्राईजेस या कंपनीच्या गेटवर आंदोलन करणाऱ्या कामगारांना चिरडण्याचा प्रयत्न मंगळवारी खुद्द कंपनीच्या वयोवृद्ध मालकीणीने केला.

कंपनीच्या बाहेर आंदोलन करणाऱ्या कामगारांवर या वयोवृद्ध मालकीणीने स्वतः चालवत असलेली गाडी त्यांच्या अंगावर चढवली. यात गाडीखाली आल्याने 3 ते 4 महिला कामगार जखमी झाल्याची घटना घडली. या संतापजनक प्रकारात जखमी झालेल्या महिला कामगारांवर स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी तात्काळ दाखल करण्यात आले. किमान वेतन आणि त्यात अधिकच काम कराव लागत असल्याने कंपनीच्या गेट समोर कामगारांच काही दिवसांपासून आंदोलन सुरू होत. त्यामुळे संतापलेल्या कंपनीच्या वयोवृद्ध मालकीणीने मंगळवारी कामगारांच्या अंगावर थेट गाडी घालून आंदोलन चिरडण्याचा गंभीर प्रकार केला. यामुळे कामगारांमध्ये अधिकच संताप निर्माण झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande