पालघर, 6 ऑगस्ट (हिं.स.)।
पालघर जिल्ह्यातील पालघर-मनोर राष्ट्रीय महामार्गावरील वाघोबा घाटातील घनदाट जंगलात एका महिलेचा झाडाला लटकलेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पालघर पोलिसांनी या मृतदेहाची पाहणी केली असता चंदा चंदू वाझे (३५) या मनोर भागातील महिलेचा असल्याची माहिती मिळाली. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. तर ही आत्महत्या की घातपात याबाबत संशय निर्माण झाला असून पालघर पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL