नांदेड - 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा केवळ 9 तासांत ‌शोध
नांदेड, 7 ऑगस्ट (हिं.स.)। मिशन निर्भया अंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी अतुलनीय कामगिरी केली आहे. 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा केवळ 9 तासांत ‌शोध लावला असल्याचे नांदेड पोलिसांनी आज माहिती दिली आहे. तांत्रिक आणि सायबर सेलच्या सहाय्याने मुलीचे लोक
पोलीस


नांदेड, 7 ऑगस्ट (हिं.स.)। मिशन निर्भया अंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी अतुलनीय कामगिरी केली आहे. 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा केवळ 9 तासांत ‌शोध लावला असल्याचे नांदेड पोलिसांनी आज माहिती दिली आहे.

तांत्रिक आणि सायबर सेलच्या सहाय्याने मुलीचे लोकेशन मिळवून, जालना परिसरातून मुलीस सुखरूप ताब्यात घेऊन तिच्या पालकांकडे सुपूर्द केले.

महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी मिशन निर्भया अंतर्गत नांदेड पोलीस सदैव सजग व तत्पर आहेत.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande