अकोला, 7 ऑगस्ट, (हिं.स.)। अकोला शहरातील रामदासपेठ पोलिसांनी रेल्वे स्टेशन चौकात नाकाबंदी दरम्यान १५ किलो गांजाची तस्करी करताना दोन तस्करांना अटक केली. आरोपी सोहेल अहमद अब्दुल शकील आणि शेख हमीद शेख रशीद हे ऑटोमधून गांजा वाहून नेत होते. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून १५ किलो गांजा, एक ऑटो आणि दोन मोबाईल असा एकूण दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई रामदासपेठ पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला यांना मिळालेल्या गोपनीय माहीती वरून रेल्वे माल धक्का चौक स्टेशन अकोला नाकाबंदी करून एक काळया रंगाचा सवारी अॅटो क्रमांक MH 30 BC 1329 मधील आरोपी १) सोहेल अहेमद अब्दुल शकील वय ४३ वर्षे व्यवसाय मजुरी रा. दहीहांडाबेस, अरबी मदरशा जवळ जुने शहर अकोला, २) शेख हमीद शेख राशीद वय ३० वर्षे व्यवसाय मजुरी गाडगे नगर, जुने शहर अकोला यांचे ताब्यातुन दोन लगेज बॅगमध्ये असलेला ओलसर फुले व पाने असलेला अंमली पदार्थ गांजा एकुण १५.७६० किलो ग्रॅम वजन किंमत ३,५४,६००/ रू.चा एक प्रवाशी अॅटो किंमत १,५०,०००/ रू दोन मोबाईल किंमत २०००/रू असा एकुण ५,०७,६००/रू रूपयाचा मुददेमाल जप्त करून आरोपीतां विरुध्द पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला येथे अप.न. २३५/२०२४ कलम ८ क, २० (ब) (ii) एन डी पी एस अॅक्ट. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधिक्षक बी. चंद्रकांत रेडडी उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सतिश कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे, सपोनी राहुल जंजाळ, पोउपनिरीक्षक निलेश गायकवाड, पोहवा किरण गवई, दादाराव टापरे, पोलीस अमंलदार श्याम मोहळे, पुरुषोत्तम डबंलकर, अनील धनर्भर, अकिंत कमलाकर, प्रेम नादोलकर महीला पो. अ. माधुरी लाहोळे, कावेरी ढाकणे सर्व पोलीस स्टेशन रामदासपेठ, अकोला तसेच पोहवा रवीद्र धिवे, पोलीस अंमलदार मोहम्मद नदीम अकोला यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे