नांदेड : आ. आनंद बोंढारकरांच्या संपर्क कार्यालयासमोर दिव्यांगांचे आंदोलन
समस्या सोडवण्याच्या आश्वासनानंतर रक्षाबंधन संपन्न
आमदार


नांदेड, 9 ऑगस्ट (हिं.स.)

रक्षाबंधनाच्या दिवशी दिव्यांगानी आज शिवसेनेचे नांदेडचे आमदार आनंद बोंढारकर यांच्या संपर्क कार्यालय येथे आंदोलन पुकारले होते. आमदारांनी समस्या सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आली दरम्यान त्यावेळी दिव्यांग बहिणींनी राखी बांधून आनंद व्यक्त केला.

आज बोंढार येथील राजगड जनसंपर्क कार्यालयासमोर सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने अर्धनग्न अवस्थेत देशभक्ती गीत लाऊन विविध मागण्यासाठी आंदोलन केले.

यावेळी आंदोलनात सहभागी होत त्यांच्या समस्या आणि अडी अडचणी,मागण्या जाणून घेतल्या ते लवकरच सोडविण्याचे आश्वासन दिले.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande