पाथर्डी फाटा चौकात भुयारी मार्ग करा : सीमा हिरे
नाशिक, 9 ऑगस्ट (हिं.स.)। - पाथर्डी फाटा येथील चौकात रोजच होणारे अपघात आणि भीषण वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी आमदार सीमा हिरेंनी दिल्लीत केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. नाशिक-मुंबई महामार्गावरील पाथर्डी फाटा येथील चौकाती
पाथर्डी फाटा चौकात भुयारी मार्ग करा : सीमा हिरे


नाशिक, 9 ऑगस्ट (हिं.स.)।

- पाथर्डी फाटा येथील चौकात रोजच होणारे अपघात आणि भीषण वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी आमदार सीमा हिरेंनी दिल्लीत केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. नाशिक-मुंबई महामार्गावरील पाथर्डी फाटा येथील चौकातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी या ठिकाणी लवकरात लवकर भुयारी मार्ग तयार करण्याची आग्रही मागणी आ. हिरे यांनी मंत्री गडकरी यांच्याकडे केली. दरम्यान, मंत्री गडकरी यांनी लगेचच संबंधित अधिकाऱ्याला फोन करून सदरचे काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

पाथर्डीगाव, नाशिककडून मुंबईच्या दिशेने जाणारी आणि मुंबईकडून येणारी वाहने, अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतीत कामाव जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहने पाथर्डी फाटा चौक परिसरातून ये-जा करत असतात. परिसरात रुग्णालये आणि विद्यालये, महाविद्यालयांची संख्य मोठी असल्याने रुग्ण, त्यांचे नातेवाईक तसेच विद्यार्थ्यांची या परिसरात मोठ वर्दळ असते. परिणामी, सदर चौकात सतत वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. या समस्येतून नागरिकांना मुक्त करण्यासाठी तसेच वाहतूक कोंडीपासून दिलासा देण्यासाठ आ. सीमा हिरेंनी दिल्लीत जात नितीन गडकरी यांची भेट घेतली.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande