बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालकाचा मृत्यू
नाशिक, 9 ऑगस्ट (हिं.स.)। - शहरातील वडनेर दुमाला गावात शुक्रवारी रात्री आयुष किरण भगत या चार वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला करून त्याला जवळ असलेल्या एका शेतात ओढत नेले होते. त्यानंतर गावातील नागरिकांनी तसेच वन विभागाच्या अधिकारी कर्मचारी व
बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालकाचा मृत्यू , रक्षाबंधनाच्या पूर्व रात्री घडली घटना


नाशिक, 9 ऑगस्ट (हिं.स.)।

- शहरातील वडनेर दुमाला गावात शुक्रवारी रात्री आयुष किरण भगत या चार वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला करून त्याला जवळ असलेल्या एका शेतात ओढत नेले होते. त्यानंतर गावातील नागरिकांनी तसेच वन विभागाच्या अधिकारी कर्मचारी व नातेवाईकांनी तब्बल साडेतीन तास शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह रात्री बारा वाजेच्या सुमारास गावा लगत ऊसाच्या मळ्यात आढळून आला.

गेल्या दोन ते चार दिवसापासून नाशिकरोडच्या जय भवानी रोड येथे बिबट्याचा वावर सुरू आहे. या घटना ताज्या असतानाच वडनेर दुमाला येथे आयुष किरण भगत या चार वर्षाच्या बालकाला बिबट्याने घराबाहेर ओट्यावरून ओढत नेले व त्याच्यावर हल्ला करून जवळच असलेल्या शेतात नेले. या घटनेनंतर नातेवाईक व आजूबाजूच्या नागरिकांना शोधमोहीम सुरू करून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली. यानंतर तातडीने वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाली व त्यांनी ड्रोनच्या साह्याने व्यापक शोधमोहीम राबवली.

या मोहिमेमध्ये उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे श्वान पथक , गुगल श्वान, स्थानिक लोकप्रतिनिधी, गावकरी युवक, आणि वनविभागाचे अधिकारी सक्रिय सहभागी होते. या शोध मोहिमेदरम्यान घराच्या मागच्या बाजूला असलेल्या दाराजवळ रक्ताचे डाग व थोड्या अंतरावर मुलाची पॅन्ट आढळून आली होती. मात्र दुर्दैवाने आयुषचा मृतदेह हाती लागल्याने परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, आयुषचे वडील किरण भगत हे खाजगी कंपनीत काम करत असून, त्यांना एक मुलगी आणि आयुष हा मुलगा होता. मात्र, रक्षाबंधनाच्या पूर्व संध्येलाच आयुषचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर दु:ख व्यक्त केले जात आहे. या दुर्दैवी घटनेने वडनेर दुमाला परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande