मुंबई, 1 सप्टेंबर (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी विराजमान झालेल्या विघ्नहर्त्याचे आज औसा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी भक्तिभावे दर्शन घेतले. तसेच आरती केली. विघ्नहर्त्याच्या आशीर्वादाने आणि देवेंद्र यांच्या कार्यकुशलतेने आंदोलनातून समाधानकारक तोडगा नक्की निघेल. असा आशावाद आमदार अभिमन्यू पवार यांनी बोलून दाखवला. मुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी विराजमान झालेल्या विघ्नहर्त्याचे दर्शन घेण्यासाठी अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis