अमरावती, 4 सप्टेंबर (हिं.स.)चेहरा ओळख प्रणालीची सक्ती तात्काळ रद्द करावी. तांत्रिक अडचणींमुळे सेविकांना अडथळा,टीएचआर मधील अन्नाचा दर्जा कमी लाभार्थी शिजलेल्या अन्नाची मागणी करतात,पोषण कार्डसाठी आवश्यक उपकरणांचा अभाव यामुळे अचूक काम करता येत नाही.
या प्रमुख मागण्या व अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक)च्या वतीने आज, गुरुवारी अमरावती जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी एकदिवसीय धरणे आंदोलन करत महिला व बालविकास विभाग कार्यालयावर जोरदार निदर्शने केली.
आंदोलनाचे नेतृत्व राज्याध्यक्ष दिलीपभाऊ उटाणे यांनी केले. जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी होत शासनाच्या धोरणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
या आंदोलनात रविकांत गवई, मीरा कैथवास, अरुणा देशमुख, माया पिसाळकर, रंजना धोटे, बेबीताई ब्राम्हणे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
आंदोलकांनी स्पष्ट इशारा दिला की, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येणार असल्याचे मोर्चेकरांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी