मुंबईतील आंदोलनकर्त्यांना परभणीतून दररोज शिदोरी
परभणी, 1 सप्टेंबर (हिं.स.)। मराठा समाजास सरसगट आरक्षण जाहीर करावे, या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या बेमुदत उपोषणात सहभागी आंदोलनकर्त्यांकरीता सकल मराठा समाजबांधवांनी परभणी येथून दररोज शिदोरी पा
मुंबईतील आंदोलनकर्त्यांना परभणीतून दररोज शिदोरी


परभणी, 1 सप्टेंबर (हिं.स.)। मराठा समाजास सरसगट आरक्षण जाहीर करावे, या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या बेमुदत उपोषणात सहभागी आंदोलनकर्त्यांकरीता सकल मराठा समाजबांधवांनी परभणी येथून दररोज शिदोरी पाठविण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईतील आंदोलनकर्त्यांना भोजन उपलब्ध व्हावे या दृष्टीने येथील सकल मराठा समाजबांधवांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून आवाहन केले तेव्हा चार ते पाच गावांमधून या आवाहनकर्त्यांना शिदोरी म्हणून चटणी, भाकरी, ठेचा, लोणचं यासह चिवडा व अन्य फराळाचे साहित्य मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाले. समाजबांधवांनी ती शिदोरी लगेचच मुंबईस रवाना केली व मुंबईतील आंदोलनकर्त्यांना आंदोलन यशस्वी होईपर्यंत शिदोरी कमी पडता कामा नये, या उदात्त हेतूने दररोज 30 ते 35 हजार जणांना पुरेल एवढे अन्न पाठविण्यास सुरुवात केली. या उपक्रमास समाजबांधवांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भारावलेल्या कार्यकर्त्यांनी आंदोलन यशस्वी होईपर्यंत शिदोरीची ही रसद पुरविण्याचा संकल्प सोडला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande