स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे, 4 सप्टेंबर (हिं.स.)। उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी ग्रामीण भागात विकास कामांची पाहणी केली. ग्रामस्थांशी संवाद साधताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागा असंही सांगितलं. अजित पवार म्हणा
ajit pawar


पुणे, 4 सप्टेंबर (हिं.स.)। उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी ग्रामीण भागात विकास कामांची पाहणी केली. ग्रामस्थांशी संवाद साधताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागा असंही सांगितलं. अजित पवार म्हणाले की, मी सकाळी लवकर कामाला सुरुवात केली. आता मी वेळेला महत्त्व देणार आहे. आज जरा जास्तच लवकर आलो. ग्रामीण भागात एकटा व्यक्ती काही करू शकत नाही, सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे. गावं डिजिटल झाली पाहिजेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत अजित पवार म्हणाले की, काही निवडणुका या जानेवारी महिन्यात जातील. याचा अधिकार निवडणूक आयोगाला असेल. जानेवारी महिन्यात नवीन बॉडी येण्याची शक्यता आहे. याचा फायदा तुम्हाला निवडणुकीत होईल. तुम्ही चांगलं काम करा. अधीच निवडणुका व्हायला हव्या होत्या. पण कोर्टात प्रकरण प्रलंबित असल्यानं निवडणुका लांबल्या. महाराष्ट्रात जिल्ह्याचा पंचायतराजमध्ये पहिला नंबर आणा असंही अजित पवार यावेळी म्हणाले. राज्यात देशात आणि जगात गणेशोत्सवाच आनंदाने सुरू आहे. जातीय सलोखा ठेवण्याचे काम पोलिस यंत्रणा काम करत असते, मंगलमय वातावरण आहे. गणपती विसर्जन बघता बघता आले, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणावे लागेल. पंचायतराज अभियान सुरू झाले आहे. या कार्यशाळा मध्ये अनेकजण सहभागी आहेत ते त्याचे अनुभव सांगतील. या अभियान उद्देश आहे की गावागावात विकास करणे,यावेळी मला आर आर पाटील याची आठवण येते,त्यांनी अनेक अभियान राबवले त्याच्या काळात,चागलं विचार आर आर ने काम केले त्याचे कौतुक झाले,अनेक गाव स्वच्छ झाली विकास झाला,यात सातत्ये टिकले पाहिजे अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande