मनमाड, 1 सप्टेंबर (हिं.स.)। इंदुर पुणे महामार्गावर अपघातांची मालिका थांबता थांबत नाही. मनमाड शहरातील इंदुर पुणे महामार्गावर शहरातील मुख्य स्मशानभूमीजवळ एक माल भरलेला ट्रक उलटला या अपघातात या ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला आहे पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले व चालकाला तात्काळ मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या महामार्गावर रोज मोठया प्रमाणावर अपघात होत असून अनेकांनी आपले प्राण गमवाले आहेत हा महामार्ग शहराच्या बाहेरून घेऊन जावा किंवा या महामार्गाचे चौपदरीकरण करावे अशी मागणी शहरातील जनतेकडून करण्यात येत आहे.
मनमाड शहरातून जाणारा इंदूर पुणे महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनला असून मनमाड शहरात रोज छोटे-मोठे अपघात होऊन अनेक जण जखमी झाले आहेत. तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर पुणे महामार्गावर शहरातील मुख्य स्मशानभूमी असलेल्या ठिकाणी एक भरलेला मालक उलटला या अपघातात चालक हा गंभीर जखमी झाला असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने चालकाला बाहेर काढून उपचारासाठी मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघात कसा झाला याबाबत पोलीस तपास करत असून या महामार्गावर रोज होणारे अपघात हे मनमाडकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढल्याने रोज वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. याशिवाय रेल्वे ओव्हर ब्रिज हा अतिशय छोटा असल्याने या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. रोज अपघात देखील होतात.हा महामार्ग मनमाड शहरातून जातो हा शहराच्या बाहेरून यावा रिंग रोड किंवा बायपास तयार करावा अन्यथा या महामार्गाची रुंदी वाढवून चौपदरीकरण करावे अशी मागणी मनमाडकर जनतेकडून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र यावर काही तोडगा निघत नसल्याने मनमाडकारांना हा त्रास सहन करावा लागत आहे.
मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर पुणे महामार्गावर धुळे औरंगाबाद संभाजीनगर महामार्गावरील कन्नड घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. याशिवाय नांदगाव ते संभाजीनगर या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने या महामार्गावरील वाहतूक मनमाड शहरातून वळविण्यात आली आहे. यामुळे या महामार्गावर जास्त वाहतूक वाढली आहे. नांदगाव संभाजीनगर हा महामार्ग लवकरात लवकर दुरुस्ती करावा जेणेकरून मनमाड इंदूर महामार्गावरील वाहतूक काही प्रमाणात कमी होईल अशी मागणी सर्वसामान्य मनमाडकर जनतेकडून करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV