रत्नागिरी विभागातून चाकरमान्यांच्या परतीसाठी एसटीच्या २५०० गाड्यांची व्यवस्था
रत्नागिरी, 1 सप्टेंबर, (हिं. स.) : गणेशोत्सव संपत आल्यानंतर आता चाकरमान्यांना परतीचे वेध लागले आहेत. गणेशभक्तांचा परतीचा प्रवास सुखकर होण्यासाठी रत्नागिरी विभागातून २ हजार ५०० एसटी बसेसची सोय करण्यात आली आहे. या सर्व बसेसचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले आहे
एसटी बस


रत्नागिरी, 1 सप्टेंबर, (हिं. स.) : गणेशोत्सव संपत आल्यानंतर आता चाकरमान्यांना परतीचे वेध लागले आहेत. गणेशभक्तांचा परतीचा प्रवास सुखकर होण्यासाठी रत्नागिरी विभागातून २ हजार ५०० एसटी बसेसची सोय करण्यात आली आहे.

या सर्व बसेसचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले आहे. येत्या ५ सप्टेंबर रोजी कोकणातून एसटी बसेस मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. त्यासाठी रत्नागिरी विभाग सज्ज झाला आहे. उत्सवाचे शेवटचे दोन दिवस शिल्लक असल्याने एसटी बसेसच्या आरक्षणाला मागणी वाढली आहे. रत्नागिरी विभागआणखी काही बसेस वाढवण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले.

गणेशोत्सवानिमित्त मुंबई, पुण्यासह अन्य शहरात काम करणारे लाखो भाविक कोकणात दाखल झाले आहेत. त्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने ५ हजार २०० बसेस तसेच रेल्वे, खासगी बस, चारचाकीने कोकणातील आपली गावे गाठली. मोठ्या भक्तिमय वातावरणात बाप्पाचे स्वागत करण्यात आले. दीड दिवसाच्या गणपतीचे मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढून निरोप देण्यात आला. दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर गणेशभक्तांचा परतीचा प्रवास सुखकर होण्यासाठी एसटीच्या रत्नागिरी विभागातून २ हजार ५०० एसटी बसेस सोडण्यात येणार आहे. त्याचे आरक्षण २२ जुलैपासून सुरू झाले.

दरम्यान, याहून अधिक मागणी आल्यास गाड्यांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande