नंदुरबार येथे ‘भटके विमुक्त दिन’ उत्साहात साजरा
नंदुरबार,, 1 सप्टेंबर (हिं.स.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे 31 ऑगस्ट रोजी ‘भटके विमुक्त दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण, विभागाचे सहाय्यक संचालक सुंदरसिंग वसावे यांनी कळविली आहे. या कार्य
नंदुरबार येथे ‘भटके विमुक्त दिन’ उत्साहात साजरा


नंदुरबार,, 1 सप्टेंबर (हिं.स.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे 31 ऑगस्ट रोजी ‘भटके विमुक्त दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण, विभागाचे सहाय्यक संचालक सुंदरसिंग वसावे यांनी कळविली आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी, राष्ट्रीय बंजारा क्रांतीचे अध्यक्ष श्रावण चव्हाण, शहाद्याचे पुरुषोत्तम चव्हाण, सुपडू खेडकर, भटक्या विमुक्त जाती हक्क परिषदेचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण भोई, तांडा समृद्धी योजनेचे अशासकीय सदस्य तसेच वडार समाज शहादाचे अध्यक्ष रवींद्र गुंजाळ यांच्यासह सर्व आश्रमशाळांचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन भटके आणि विमुक्त समाजाच्या इतिहासाची माहिती, स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान आणि आजच्या समाजातील गरजा यावर प्रकाश टाकण्यासाठी करण्यात आले होते.

यावेळी, मान्यवरांनी आपल्या भाषणातून भटके आणि विमुक्त समाजाच्या समस्या दूर करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करत आहे असे सांगितले. तसेच शिक्षणाचे महत्त्व, समाजातील तरुणांनी एकजूट राहणे आणि हक्कांसाठी सजग राहणे यावर जोर दिला. कार्यक्रमात समाजप्रबोधनपर व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, गरजूंना जात प्रमाणपत्रांचे वाटपही करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कला-गुणांचे उपस्थितांनी कौतुक केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande