अकोला, 13 सप्टेंबर (हिं.स.) : या देशाची संस्कृती मातृशक्तीचा सन्मान करणारी आणि दृष्टांचा सहार मातृशक्तीने केल्याचा तसेच समाज सुधारण्याचे काम मातृ शक्ती करत असते परंतु आईचा आणि मातृशक्ती तापमान करण्याची परंपरा काँग्रेसची असून राहुल गांधी यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी पंतप्रधानांच्या आईचा अपमान आम्ही सहन करणार नाही अशा शब्दात भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जोडो मारो आंदोलन कार्यक्रम करून जोरदार काँग्रेस आणि त्यांचे सहकारी तेजस्वी यादव, उभाठा, सेना निषेध व्यक्त करण्यात आला.
संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोटेकर भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर खासदार अनुप धोत्रे आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल संतोष शिवरकर जयंत मसने, विजय अग्रवाल सुमन ताई गावंडे कुसुमताई भगत वैशालीताई निकम चंदाताई शर्मा, जयश्रीताई फुंडकर राधा तिवारी, एडवोकेट रूपाली काकड, गीतांजली ताई शेगोकार, वैशालीताई शेळके, मोनिकाताई गावंडे यांच्या नेतृत्वात लोकशाहीचे बचावासाठी संघर्ष करणारे आणीबाणीच्या विरोधात काँग्रेसच्या विरोधात सगळ्यांना एकत्रित करणारे लोकनायक जयप्रकाश नारायण चौक भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर खुलेनाट्यगृह समोर निदर्शने करून राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जूते मारू आंदोलन करून काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली भारत माता की जय देश पंतप्रधान नरेंद्र मोदी आगे बढो, मातृशक्ती का अपमान नही सहेगा हिंदुस्तान, मातृ शक्ति के सन्मान में भाजपा महिला आघाडी मैदान मे राहुल गांधी मुर्दाबाद, तेजस्वी यादव मुर्दाबाद, काँग्रेस प्रणित आघाडी मुर्दाबाद अशा गगनभेदी नाऱ्यांनी परिसर दुमदुमले.
या कार्यक्रमातमहानगर अध्यक्षा सौ.वैशाली ताई शेळके,माजी महिला मोर्चा महानगर अध्यक्षा सौ. चंदा ताई शर्मा, जिल्हाध्यक्ष सौ.जयश्री ताई फुंडकर, सुमन ताई गावंडे,सुनीता भाभी अग्रवाल,रश्मी कायंदे,रंजना विंचनकर,छाया मिश्रा,ज्योती शर्मा, रविता शर्मा,ज्योती मानकर,राखी तीहिले,वंदना पंचोली,संध्या लोहकपुरे,आरती घोगलीया, अनिता चौधरी,अनिता गिरी,जान्हवी डोंगरे,शकुंतला जाधव,प्रणिता समरीतकर, जयमाला खेडकर, चंदा ठाकूर,मनिषा भन्साली,सारिका जयस्वाल, वर्षा गावंडे, शेगोकारताई, साधना येवले,संगीता जानोरकर,भाग्यश्री मापारी, आदींच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे