परभणी : चालत्या रेल्वे गाडीत महिलेची प्रसुती -डॉ. करवंदे यांची तत्परता
परभणी, 13 सप्टेंबर (हिं.स.)। एक गर्भवती महिला प्रवासी प्रवास करत असताना चालत्या रेल्वेगाडीत प्रसूतीच्या कळा येत असल्याने माहिती मिळताच वैद्यकीय अधिकाऱ्याने तत्परता दाखवून रेल्वेगाडीतच महिलेची प्रसुती करून महिला व मूल वाचविल्याची घटना पूर्णा रेल्वे स्
चालत्या रेल्वे गाडीत महिला प्रसूत -डॉ. करवंदे यांची तत्परता


परभणी, 13 सप्टेंबर (हिं.स.)। एक गर्भवती महिला प्रवासी प्रवास करत असताना चालत्या रेल्वेगाडीत प्रसूतीच्या कळा येत असल्याने माहिती मिळताच वैद्यकीय अधिकाऱ्याने तत्परता दाखवून रेल्वेगाडीतच महिलेची प्रसुती करून महिला व मूल वाचविल्याची घटना पूर्णा रेल्वे स्टेशन येथे घडली.

याविषयी अधिक माहिती अशी की, भगत की कोठी या रेल्वेगाडीतून राजस्थान मधील एक गर्भवती महिला प्रवासी प्रवास करत असताना प्रवासादरम्यान अचानक पूर्णा परिसरात तिला त्रास जाणवू लागला. उपस्थित प्रवाशांनी ही माहिती पूर्ण स्टेशन येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळविली. पूर्णा येथील रेल्वे हॉस्पिटलचे डॉ. कपिल करवंदे यांना माहिती मिळतात कुठलाही वेळ न दडवता त्यांनी संबंधित महिला रुग्ण असलेली कोच क्रमांक एस - ५ सीट नंबर - ३ गाठून गर्भवती महिलेची तपासणी केली. रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याएवढा वेळ नसल्याचे लक्षात येतात डॉ. कपिल करवंदे यांनी रेल्वे गाडीतच गर्भवती महिलेवर उपचार करत प्रसुती केली. योग्य ते उपचार करून बाळ व माता या दोघांनाही नातेवाईकांकडे सुपूर्त केले. डॉ. कपिल करवंदे यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे बाळ व माता दोघांचेही जीव वाचले असून या सेवेबद्दल डॉ. करवंदे यांचे कौतुक होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande