फटाके विक्री तात्पुरत्या परवान्यासाठी 19 सप्टेंबरपर्यंत अर्ज करा - परभणी जिल्हाधिकारी
परभणी, 13 सप्टेंबर (हिं.स.)। यंदा 18 ऑक्टोबरपासून दीपावली सण साजरा करण्यात येणार आहे. या सणानिमित्त इच्छुक व्यक्तींना फटाके विक्रीसाठी पंधरा दिवस कालावधीकरीता तात्पुरते फटाके विक्री परवाना देण्यासंबंधी जाहीर प्रगटनाच्या दिनांकापासून ते दि. 19 सप्टे
फटाके विक्री तात्पुरत्या परवान्यासाठी 19 सप्टेंबरपर्यंत अर्ज करा - परभणी जिल्हाधिकारी


परभणी, 13 सप्टेंबर (हिं.स.)।

यंदा 18 ऑक्टोबरपासून दीपावली सण साजरा करण्यात येणार आहे. या सणानिमित्त इच्छुक व्यक्तींना फटाके विक्रीसाठी पंधरा दिवस कालावधीकरीता तात्पुरते फटाके विक्री परवाना देण्यासंबंधी जाहीर प्रगटनाच्या दिनांकापासून ते दि. 19 सप्टेंबरपर्यंत विस्फोटक अधिनियम 2008 मध्ये दिलेल्या विहीत नमुन्यातील अर्ज या कार्यालयात स्विकारले जातील. मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज स्विकारले जाणार नाहीत. फटाके विक्री परवान्याकरिता काही अटींचे पालन होणे आवश्यक आहे. तात्पुरता फटाके विक्री परवानाकरिता या कार्यालयास अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande