कोल्हापूर - शिक्षकांना वाढीव टप्पा मिळवून दिल्याबद्दल खा. महाडिक यांचा सत्कार
कोल्हापूर, 13 सप्टेंबर (हिं.स.)। विनाअनुदानित शाळा कृती समितीकडून, वाढीव टप्पा अनुदान मिळावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा चालू होता. या समितीने खासदार महाडिक यांची भेट घेवून, या प्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानुसार खासदार धनंजय महाडिक य
खा. धनंजय महाडिक यांचा सत्कार


कोल्हापूर, 13 सप्टेंबर (हिं.स.)।

विनाअनुदानित शाळा कृती समितीकडून, वाढीव टप्पा अनुदान मिळावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा चालू होता. या समितीने खासदार महाडिक यांची भेट घेवून, या प्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानुसार खासदार धनंजय महाडिक यांनी शासन आणि शिक्षक यांच्यामध्ये मध्यस्थाची भूमिका निभावली. त्याला यश आले म्हणून महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली आज खासदार धनंजय महाडिक यांचा तुळशीचा हार घालून सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्रातील हजारो शिक्षकांना गणेशोत्सवापूर्वी, वाढीव टप्प्याचा शासन आदेश मिळाला. त्याबद्दल शिक्षक संघटनांच्यावतीने आज खासदार धनंजय महाडिक यांचा तुळशीचा भव्य हार अर्पण करून विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सुभाष खामकर, रंगराव तोरस्कर, केदारी मगदूम, सोलापूरचे मच्छिद्र सावंत, सोमनाथ पवार, अविनाश पाटील, सचिन चौगुले, शितल जाधव, सचिन आंबी, विनायक सपाटे, सावता माळी, भानुदास गाडे, जयदीप चव्हाण, भाग्यश्री राणे यांच्यासह शेकडो शिक्षक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande