लातूर, 13 सप्टेंबर (हिं.स.)।
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील तरुण भरत कराड याच्या निवासस्थानी भेट दिली आणि कुटुंबीयांचे सांत्वन केले.
यावेळी लक्ष्मण हाके म्हणाले की,आत्महत्येची बातमी ऐकून मन सुन्न झालं. ओबीसी आरक्षणाच्या चिंतेतून त्याने उचललेलं हे पाऊल संपूर्ण समाजासाठी एक मोठा धक्का आहे.
आज भरतच्या कुटुंबाला भेटलो, त्यांचं सांत्वन केलं आणि त्यांना धीर दिला.
भरतचं जाणं हे त्याच्या कुटुंबाचंच नाही, तर आपल्या सगळ्यांचं नुकसान आहे. ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने लढा सुरू आहे. तरीही, कोणत्याही तरुणाने असं टोकाचं पाऊल उचलू नये, ही माझी हात जोडून विनंती आहे. या दुखाच्या प्रसंगी कराड कुटुंबासोबत आम्ही सगळे आहोत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis