भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचा विक्रमी १५० वा वनडे सामना
चंदीगड, 14 सप्टेंबर (हिं.स.)महिला एकदिवसीय विश्वचषकापूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू झाली आहे. पहिल्या सामन्यात नाणेफेकीसाठी आलेल्या कर्णधार हरमनप्रीत कौरने एक विशेष कामग
हरमनप्रीत कौर


चंदीगड, 14 सप्टेंबर (हिं.स.)महिला एकदिवसीय विश्वचषकापूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू झाली आहे. पहिल्या सामन्यात नाणेफेकीसाठी आलेल्या कर्णधार हरमनप्रीत कौरने एक विशेष कामगिरी केली. हा सामना तिच्या एकदिवसीय कारकिर्दीतील १५० वा सामना ठरला आहे. भारतासाठी १५० किंवा त्याहून अधिक एकदिवसीय सामने खेळणारी हरमनप्रीत तिसरी भारतीय महिला क्रिकेटपटू बनली आहे.

या खास प्रसंगी, पंजाब क्रिकेट असोसिएशन आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तिला स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले. सामन्यादरम्यान नाणेफेकीनंतर हरमनप्रीत कौरने आपल्या १५० व्या एकदिवसीय सामन्याबद्दल आनंद व्यक्त केला. तिने सांगितले की, हा तिच्यासाठी एक लांब प्रवास असणार आहे. आणि तिला आशा आहे की, हा प्रवास अनेक वर्षे सुरू राहील. एकदिवसीय विश्वचषकापूर्वी भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे.

हरमनप्रीत कौरच्या आधी मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांनी १५० किंवा त्याहून अधिक एकदिवसीय सामने खेळण्याचा पराक्रम केला होता. मिताली राज आणि झुलन गोस्वामी या दोघीही २०० हून अधिक एकदिवसीय सामने खेळलेल्या भारती महिला क्रिकेटपटू आहेत. भारतीय कर्णधाराच्या १५० हून अधिक सामने पूर्ण झाल्याबद्दल बीसीसीआयने सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या विशेष कामगिरीबद्दल भारतीय कर्णधाराने म्हटले आहे की, हे तिच्यासाठी खूप चांगले आहे. आणि ती आणखी अनेक वर्षे भारतासाठी खेळण्याची आशा करते.

हरमनप्रीत ही १५० एकदिवसीय सामने खेळणारी केवळ १० वी महिला क्रिकेटपटू आहे. यापूर्वी मिताली राज, झुलन गोस्वामी, चार्लोट एडवर्ड्स, सुझी बेट्स, स्टेफनी टेलर, ऍलिस पेरी, मिग्नॉन डू प्रीझ, सोफी डेव्हाईन आणि मॅरिझाने कॅप यांनी ही कामगिरी केली होती. हरमनप्रीतच्या एकदिवसीय कारकिर्दीवर नजर टाकली तर तिने ३७.६७ च्या सरासरीने ४०००+ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ७ शतके आणि १९ अर्धशतके आहेत. हरमन ही भारतासाठी एकदिवसीय सामन्यात ४००० पेक्षा जास्त धावा करणारी केवळ तिसरी भारतीय महिला क्रिकेटपटू आहे. तिच्या पुढे फक्त मिताली राज आणि स्मृती मानधना आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande